ट्विटरवरील जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विप्ट हिने प्रथम क्रमांका मिळविला आहे. अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, प्रसिध्द गायक जस्टीन विबर यांच्यापासून टेस्टाचे अध्यक्ष एलॉन मस्क यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.Prime Minister Narendra Modi ranks second behind American singer Taylor Swift, the most influential on Twitter
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : ट्विटरवरील जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विप्ट हिने प्रथम क्रमांका मिळविला आहे. अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, प्रसिध्द गायक जस्टीन विबर यांच्यापासून टेस्टाचे अध्यक्ष एलॉन मस्क यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
कंज्युमर इंटेलिजन्स कंपनी ब्रँडवॉचने केलेल्या वार्षिक संशोधनानुसार ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ७२.५ मिलीयन म्हणजे सात कोटी २५ लाख फॉलोअर्स आहेत. जगभरातील लोक त्यांना फॉलो करताच पण त्याचबरोबर त्यांची ट्विट रिट्विट होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे.
मोदी यांच्याबरोबरच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर यालाही प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळाले आहे. अमेरिकन अभिनेते ड्वेन जॉन्सन आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि युनायटेड स्टेट्सच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यापेक्षा सचिनने वरचे स्थान मिळविले आहे. प्रशंसनीय वास्तविक कार्य, योग्य कारणांसाठी उठवलेला आवाज आणि कार्याचे अनुसरण करणारे चाहते यांच्यामुळे सचिनला हे स्थान मिळाले आहे.
सचिन तेंडूलकर हे राज्यसभेचे खासदार देखील आहेत. अनेक वर्षे युनिसेफशी संबंधित आहेत. 2013 मध्ये त्यांची दक्षिण आशियासाठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ब्रँडवॉच कंपन्यांना त्यांच्या ब्रँडच्या आॅनलाइन विश्लेषण करण्यासाठी माहिती आणि माध्यम प्रदान करण्यासाठी सोशल मीडिया डेटा वापरते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App