विशेष प्रतिनिधी
मुबंई : धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारत देशाला सर्व जगामध्ये ओळखलं जातं. असे असताना देखील भारतात राहणाऱ्या लोकांना मात्र बऱ्याच वेळा बरेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे छोट्या पडद्या वरील अभिनेत्रीला ती जैन नसल्या कारणाने जैन मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.
Famous actress denied entry to Jain temple for not being Jain!
छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ ही एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेमध्ये सईच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये ती सांगते की, तिला एका मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. मुग्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुग्धा 7 नोव्हेंबर रोजी कल्याण परिसरामधील प्रसिध्द मानस मंदिरात गेली होती. हे एक जैन मंदिर आहे. सुरुवातीला तिला व तिच्या मैत्रिणींना तेथील लोकांनी ओढणी दिली. मात्र रांगेमध्ये देवदर्शनासाठी उभे असताना तुम्हाला मंदिरात आम्ही जाऊ देऊ शकत नाही असे तेथे सांगण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, तुम्ही जैनधर्मीय नाही. त्यामुळे तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही.
https://www.instagram.com/tv/CV-1YuOqkRA/?utm_source=ig_web_copy_link
हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागावी
मुग्धा ह्या व्हिडीओमध्ये म्हणते की, मी स्वतः कोणतीही जात धर्म या गोष्टींमध्ये भेदभाव करत नाही. हिंदू धर्मीयांच्या मंदिरात सर्वांना प्रवेश दिला जातो. पण जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. पण फक्त मी जैनधर्मीय नसल्यामुळे तेथे प्रवेश नाकारण्यात आला. आणि माझ्यासाठी हा अनुभव खूपच वाईट होता. या गोष्टींवर आता कुणीतरी काहीतरी कारवाई केली पाहिजे. असे देखील मुग्धा आपल्या या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App