लातूर : चोरट्यांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. Latur: Police sub-inspector killed while chasing thieves


विशेष प्रतिनिधी

लातूर : लातूरमध्ये रात्रीच्या गस्तीदरम्यान घरफोडी करीत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे लातूर येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.चोरट्यांचा पाठलाग करताना पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे अहमदखान पठाण यांचे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.तसेच अहमदखान पठाण यांना शोक सलामी देण्यात आली.



नेमक काय घडलं

सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्य सुमारास लक्ष्मी कॉलनी मधील एका घरात चोर शिरले. दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी लगेच एलसीबीची गाडी पोहचली. तीन चोर चोरी करत होते. दरम्यान पोलिसांना पाहताच चोर मागच्या बाजूने पळून गेले. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करू लागले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अहमद खान पठाण (वय 56) चोरांचा पाठलाग करताना खाली कोसळले. त्यांना तत्काळ त्यांना शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून घोषित करण्यात आले.

Latur : Police sub-inspector killed while chasing thieves

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात