सध्या शालेय मुलांचा ताबा ज्या जंक फूड किंवा तत्सम पदार्थानी घेतला आहे, त्याचे घातक परिणाम साऱ्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात घ्यायला हवा. असे पदार्थ टाळायला हवेत, जे पदार्थ मेंदूसाठी अयोग्य असतात. ज्यांना बौद्धिक कामांसाठी बुद्धी तरतरीत ठेवण्याची गरज असते,Fluid that makes the body intelligent
त्या सर्व वयाच्या लोकांनी हे टाळलं पाहिजे. याचे कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आहे. मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला विशिष्ट द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी महत्त्वाचा असतो. शरीराचं, बुद्धीचं सर्व काम याच्या मार्फतच चालतं. बुद्धी तरतरीत राहण्यासाठी जो चांगला खाऊ पेशींना द्यायला हवा, तो द्यायचं काम हा द्रवपदार्थ करत असतो.
परंतु समजा चुकून या द्रवातल्या घटकांमध्ये काही प्रमाणात बदल झाला तर लहान मोठे घोटाळे व्हायला लागतात. मेंदूच्या पेशीच्या अंतर्गत जे संदेशवहनाचं काम अव्याहत आणि बिनबोभाटपणे चाललेलं असतं त्यात अडथळे येतात. म्हणूनच या द्रवाचं प्रमाण योग्य राहील याची काळजी आपलं शरीर घेत असतं. आपल्या शरीराला या कामासाठी मदत करायची तर योग्य आहार घ्यायला हवा.
त्याचप्रमाणे कोणत्याही वयात खेळ व्यायाम यांची कमतरता असेल तर ते मेंदूसाठी घातकच आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. मुलं जेवढी खेळतील तसा कॉर्पस कलोझम सक्षम होतो. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल- व्यायाम महत्त्वाचा! मेंदू सशक्त आणि तरतरीत ठेवायचा असेल तर मुलांनी खेळायला हवं. विविध प्रकारचे व्यायाम करायला हवेत. यामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. पेशींना ऑक्सिजन मिळतो. विविध मदानी खेळ, व्यायाम यालाच नृत्याचीही जोड देता येते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App