विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या संघटनेच्या ३५० कार्यकर्त्यांची सुटका करणे इम्रान खान यांच्या सरकारला भाग पडले आहे. इस्लामाबादला लाँग मार्च काढण्याचा इशारा या कट्टर इस्लामी संघटनेने दिला होता.Pak PM will release 350 peoples of TLP
त्यामुळे उद्भवणारा पेच टाळण्यासाठी गृह मंत्री शेख रशीद यांनी हा निर्णय जाहीर केला.टीएलपीचे प्रमुख साद हुसेन रिझवी यांची इस्लामाबादमधील तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून इम्रान सरकारविरुद्ध देशभर निदर्शने सुरु आहेत.
लाहोरमध्ये याची तीव्रता जास्त आहे. विरोधी पक्षांनीही त्यांना साध दिली आहे. लाहोरसह इस्लामाबाद, रावळपिंडी अशा अनेक शहरांतील व्यवहार अंशतः ठप्प झाले आहेत. बुधवारी कार्यकर्ते आणि पोलिसांत चकमक झडली. त्यात तीन पोलिस आणि सात कार्यकर्ते मारले गेले.
रशीद यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळाने तुरुंगातील रिझवी यांच्यासह टीएलपीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात टीएलपीचे कार्यकर्ते मुरीदके येथेच थांबतील आणि ते इस्लामाबादला जाणार नाहीत असे ठरले. कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यात येतील, असेही ठरले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App