विशेष प्रतिनिधी
येवला : पाडव्याच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील येवला शहरामध्ये रेड्यांची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. त्यात रेड्यांची आकर्षक सजावट करून मिरवणूक काढण्यात आली. Procession of reds in Yeola; Get vaccinated, avoid corona, this is an enlightening, public awareness message
येवला शहरातील रामभाऊ भगत,भोला भगत व योगेश भगत या भगत कुटुंबाने इंद्रा नामक रेड्यावर ..”लस घ्या कोरोना टाळा” असा जनजागृतीपर संदेश रेखाटला आहे. रेड्याच्या दुसऱ्या बाजूने.. “शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्या”.. असा शेतकऱ्याची व्यथा मांडणार संदेश रेखाटला आहे. दरवर्षी पाडव्याला व भाऊबीजेला लोक रेड्यावर अनोखे असे संदेश रेखाटून आकर्षक सजावट करून दीपावली सण साजरा करण्यात येत असतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App