नारायण राणे यांनी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकी च्या निकालावर शंका घेत कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाही तर अपक्ष उमेदवार असल्याचं वक्तव्य केलं. I am the most different..but not wrong !!! Sanjay Raut’s Narayan Rane Aimed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वाघिणीने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे.या निकालावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात एकमेकांवर टीका करणे चालूच आहे. नारायण राणे यांनी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकी च्या निकालावर शंका घेत कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाही तर अपक्ष उमेदवार असल्याचं वक्तव्य केलं.
मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.दरम्यान या टीकेला प्रत्युत्तर देताना ट्विट करत “सबसे अलग हुं..पर गलत नही !!!”असा टोला नारायण राणेंना राऊतांनी लगावला.
देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही’, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
सबसे अलग हुं..पर गलत नही !!!……………………जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत…त्यांचा हा जळफळाट आहे..जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा..शिवसेना जिंदाबाद!!! pic.twitter.com/c934vQqv0w — Sanjay Raut (@rautsanjay61) November 5, 2021
सबसे अलग हुं..पर गलत नही !!!……………………जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत…त्यांचा हा जळफळाट आहे..जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा..शिवसेना जिंदाबाद!!! pic.twitter.com/c934vQqv0w
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 5, 2021
सबसे अलग हुं..पर गलत नही !!! जे सांगतात दादरा नगर हवेली च्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन देलकर शिवसेनेच्या नाहीत… त्यांचा हा जळफळाट आहे..जरा ही भारत निर्वाचन आयोगाची website पहा..शिवसेना जिंदाबाद, असं म्हणत राऊतांनी नारायण राणेंना जोरदार टोला लगावला आहे. आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App