वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात विविध मुद्यावर भाष्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता घोषणा करत आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे.Has the Chief Minister changed in the state? : Chandrakant Patil; How does Sharad Pawar announce?
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश मानावा आणि संप मागे घ्यावा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने जर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. राज्य सरकार केवळ चेक हातात घेऊन फिरत होते.”
इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App