विशेष प्रतिनिधी
केदारनाथ : काही अनुभव इतके अलौकिक असतात, इतके अनंत असतात की ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत मला बाबा केदारनाथ धाम इथे अशीच अनुभूती येते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Supernatural experience at Kedarnath Dham, Prime Minister Narendra Modi’s statement
पंतप्रधानांच्या हस्ते श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण केदारनाथ येथे झाले.यावेळी पंतप्रधान म्हणाले, आदि शंकराचार्य यांचे जीवन जितके विलक्षण होते तितकेच ते सामान्य माणसाच्या कल्याणासाठी समर्पित होते.
भारतीय तत्त्वज्ञान मानवी कल्याणाविषयी सांगते आणि जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहते. आदि शंकराचार्यांनी समाजाला या सत्याची जाणीव करून देण्याचे काम केले. आपल्या सांस्कृतिक वारसा केंद्रांकडे पाहिले जायला हवे तशा योग्य आणि न्याय्य गौरवभावाने पाहिले जात आहे.
अयोध्येत भगवान श्री रामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. अयोध्येला पुन्हा वैभव प्राप्त होत असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, भारत आज स्वतःसाठी कठीण उद्दिष्टे आणि निर्धारित मुदत ठरवतो.
भारताला आज कालमर्यादा आणि उद्दिष्टांबाबत भीती बाळगणे मान्य नाही. उत्तराखंडच्या लोकांच्या अफाट क्षमतांवर असलेला पूर्ण विश्वास लक्षात घेऊन, राज्य सरकार उत्तराखंडच्या विकासाच्या लक्ष केंद्रित केले आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App