प्रतिनिधी
कोल्हापूर: राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली झाली असली तरी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मात्र दर्शनासाठी ई पासची सक्ती आहे. ही ई पासची सक्ती रद्द करावी या मागणीसाठी आज भाजपच्यावतीने अंबाबाई मंदिराबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.In Kolhapur – e-pass cancellation Bjp is aagresive
महाद्वार गेट समोर हे आंदोलन करत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. एका बाजूला बाजारपेठेत गर्दी असताना भाविकांना देवीच्या दर्शनासाठी वंचित का ठेवले जाते असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दिवाळीसाठी महाद्वार रोडवर गर्दी असताना झालेल्या आंदोलनाने अनेकांचं लक्ष वेधलं. येत्या चार दिवसात ई पास ची सक्ती रद्द न केल्यास आम्ही मंदिराची कुलूप तोडून भाविकांना प्रवेश देऊ असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App