“चोराच्या उलट्या बोंबा…! ” आमदार श्वेता महाले यांची नवाब मलिक यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका

मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.MLA Shweta Mahale criticizes Nawab Malik in harsh words


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. यावर भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर जोरदार टीका केली आहे.

श्वेता यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव.! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,”कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात”.

दुसऱ्या ट्विटमध्ये श्वेता महाले यांनी बोचरी टीका केली आहे. महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या, असा सल्लाच महाले यांनी दिला आहे.

MLA Shweta Mahale criticizes Nawab Malik in harsh words

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात