विशेष प्रतिनिधी
दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आलीये. यासंदर्भातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर शनिवारी याच खटल्यातून निर्दोष सुटलेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा खुलासा केला. Sadhvi Pragya
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. दरम्यान, त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक खुलासे केले. ज्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आणि त्यासंदर्भात त्यांचा करण्यात आलेला छळ यावर भाष्य केलं. साध्वी यांनी सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोटात मोदी आणि योगी यांना अडकवण्याचा प्लॅन होता. त्यासाठी तपास अधिकारी आपल्यावर दबाव टाकत होते. त्यावेळी त्या गुजरात मधील सुरत येथे वास्तव्यास होत्या.
तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव घेण्यासाठी देखील दबाव आणल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला. दबाव असूनही कोणाचेच नाव न घेतल्याचा, तसेच सुनावणीवेळी याचे लिखित दावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपण याविषयीचा जबाब दिलेला असतानाही एनआयएच्या विशेष न्यायालयाने जो निकाल दिला, त्यात त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांचा उल्लेख ही नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. Sadhvi Pragya
एवढंच नाही, आपल्या विरुद्धचा संपूर्ण खटला हा निराधार असल्याच साध्वी यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे दुष्ट व्यक्ती आहेत. परमबीर सिंग, हेमंत करकरे, आणि सुखविंदर सिंग यांनी आपला छळ केला, तसंच आपल्यावर खोटं बोलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा, साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.
न्यायाधीश लाहोटी यांनी फेटाळले सर्व आरोप
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी त्यांच्या निकालात साध्वींचा झालेला छळ आणि त्यांच्याशी गैरप्रकार झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे ठरवले आहेत. लाहोटी यांनी या प्रकरणाच्या निकालपत्रात साध्वी यांच्या छळाच्या कहाणीसंदर्भात पूर्णपणे असहमती दर्शवली. साध्वी यांचा छळ किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे कोणतेही पुरावे आपल्या निदर्शनास आलेले नाहीत आणि म्हणूनच आपण त्यांचा याविषयीचा दावा स्वीकारण्यास तयार नाही, असे न्यायाधीश लाहोटी यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App