उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने रोजगार देण्याबाबत विक्रम केला आहे. चार वर्षांत सरकारने चार लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. नोकऱ्या देण्याबाबत उत्तर प्रदेश देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे Yogi government in Uttar Pradesh
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने रोजगार देण्याबाबत विक्रम केला आहे. चार वर्षांत सरकारने चार लाख लोकांना नोकऱ्या दिल्या. नोकऱ्या देण्याबाबत उत्तर प्रदेश देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. Yogi government in Uttar Pradesh
चीनी व्हायरसच्या काळात देशात इतर ठिकाणी नोकऱ्या जात होत्या. मात्र, त्यावेळीही उत्तर प्रदेशातील भरती प्रक्रिया थांबली नव्हती. स्थलांतरीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योगी सरकारने अनेक अभिनव उपक्रम राबविले. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील ग्रामीण कारागिरांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.
योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच ट्युबवेल चालकांची नियुक्ती प्रक्रिया राबविली. त्यांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उमेदवारांशी संवाद साधला. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि नैतीकतेने करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या उमेदवारांच्या बुध्दीमत्तेची चाचची घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही या भरती प्रक्रियेचे कौतुक केले आहे.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, निवड झालेल्या सर्व ३२०९ उमेदवारांना अभिमान वाटायला हवा की कोणत्याही वशिल्याशिवाय त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांची बुध्दीमत्ता, क्षमता आणि कष्ट यामुळेच त्यांची निवड झाली आहे. गुणवत्ता याच एकमेव निकषावर त्यांनी नोकरी मिळविली आहे.
उत्तर प्रदेशातील विविध विभागांत नव्याने निर्माण केलेल्या नोकऱ्यांची यादी पाहिल्यावर सरकारच्या कामाचा अंदाज येतो. गेल्या चार वर्षांत पोलीस विभागात 1 लाख 37 हजार 253, शिक्षण विभागात 1 लाख 21 हजार राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 28 हजार 622 उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या मार्फत 26 हजार 103 प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळातर्फे 16 हजार 708 आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात 8 हजार 556, माध्यमिक शिक्षण विभागात चौदाशे तर उच्च शिक्षण विभागात 4 हजार 615 नोकऱ्या देण्यात आल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App