चीनी व्हायरसच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सरकारची चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे. तसेच, मोदींच्या व्हॅक्सीन कंपन्यांच्या दौऱ्यानंतर होत असलेली बैठक महत्वाची मानली जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सरकारची चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे. तसेच, मोदींच्या व्हॅक्सीन कंपन्यांच्या दौऱ्यानंतर होत असलेली बैठक महत्वाची मानली जात आहे. pm modi news
मोदींसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालदेखील सामील होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांत दुसऱ्यांदा कोरोना लस बनवणाऱ्या टीमसोबत चर्चा केली. मोदींनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे जिनोवा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्या पथकांशी चर्चा केली. या कंपन्यांच्या लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात आहे. यांचा डेटा आणि निकाल पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याची अपेक्षा आहे. लस संसोधन, उत्पादनाची चर्चा चालू असताना सर्वसामान्यांना लसीच्या परिणामांसारख्या गोष्टी पटवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला.
या चर्चेत लसीच्या वितरणासाठीचे लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन या विषयांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी या कंपन्यांच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच लस विकासाच्या प्लॅटफॉर्मबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना लस मंजुरीशी संबंधित प्रक्रिया व इतर बाबींबाबत सूचना देण्यास सांगितले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार मोदींनी संबंधित विभागांना सांगितले की, लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून त्यांचे प्रश्न सोडवावेत. जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळू शकेल.
शनिवारी मोदींनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट, अहमदाबादेतील जायडस बायोटेक पार्क आणि हैदराबादमधील भारत बायोटेक प्लांटचा दौरा केला होता. मोदींनी या तिन्ही कंपन्यांच्या लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App