विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर पंजाबी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, बिहार आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. अखिल भारतीय किसान समन्वय समितीने त्यांना निवेदन देऊन कृषी कायदे मागे घेण्याला विरोधही दर्शविला आहे. farmers from maharashtra bihar haryana supports farm bills
शेतकरी नेते शरद जोशी यांनी ३० वर्षांपूर्वी ज्या शेतीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा सूचविल्या होत्या, शेतकऱ्याला मुक्त व्यवस्थेत शेती आणि व्यापार करण्यासाठी वातावरण तयार करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
केंद्र सरकारने त्या सूचनांचा २५ – ३० वर्षांनी विचार करून कृषी कायद्यांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. अशा स्थितीत कोणत्याही आंदोलनाला बळी न पडता केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घेऊ नयेत, असे किसान समन्वय समितीने निवेदनात स्पष्ट केले आहे.
बाजार समित्यांची मक्तेदारी मोडणे ही मागणीही फार पूर्वीपासूनची आहे. सध्या लागू झालेल्या कायद्यांनुसार त्यांचे अस्तित्व कायम राहिले तरी शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीची मोकळिक मिळाल्याने त्यांना चांगल्या भावामध्ये आपले उत्पादन विकता येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App