कृषी कायद्यांना विरोध ही पवार, द्रमुक, अकालींची भूमिका दुटप्पी; फडणवीसांचे टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्राच्या कृषी सुधारणा कायद्यांना आज विरोध करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दुटप्पी भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उघड केली. केवळ त्यांचीच नव्हे, तर तामिळनाडूतील द्रमुक, पंजाबमधील अकाली दल यांच्या दुटप्पी भूमिकांवर देखील त्यांनी प्रकाश टाकून टीकास्त्र सोडले. devandra fadanvis targets sharad pawar

फडणवीस म्हणाले की कृषी विषयाच्या सुधारणांबाबत शरद पवार हे सत्तेवर असताना आग्रही होते. त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सुद्धा या देशातील कृषी सुधारणा, कायदे या प्रश्नांचा सविस्तर उहापोह आहे. त्यामध्ये शेतमालाच्या खुला बाजाराचे समर्थन आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपविण्याचीच भूमिका मांडली आहे. केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कायदयांमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. devandra fadanvis targets sharad pawar

तामिळनाडूलता द्रमुक पक्ष सुद्धा उद्याच्या भारत बंदला पाठिंबा देत असला तरी 2016 च्या विधानसभा निवडणुकीत कृषी सुधारणा विधेयकांचे आश्वासन त्या पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. 12 डिसेंबर 2019 रोजी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत अकाली दलाने वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी अकाली दलाचे प्रतिनिधी म्हणाले होते की, एपीएमएसी भ्रष्टाचार-राजकारणाचे अड्डे बनले आहेत. केवळ दलालांचा तेथे बोलबाला असतो आणि त्यामुळे एपीएमएसी या शेतकर्‍यांच्या हिताच्या नाहीत, याची आठवण देखील फडणवीसांनी करवून दिली.

शिवसेना, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष या सर्वांनी सुद्धा त्यावेळी तीच भूमिका घेतली. आज शेतकऱ्यांच्या आंदोलनात गर्दी झाल्याने सारे विरोधी पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत आहेत. आणि आज केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांनी दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका फडणवीस यांनी केली.

ड्रीम फडणवीसांचे; समृध्दी महामार्गावर हेलिकॉप्टर लँड मात्र ठाकरेंचे!!

देशात जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांची ही भूमिका घेतली असली तरी शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

devandra fadanvis targets sharad pawar

  • “शरद पवार केंद्रात सत्तेवर असताना कृषी सुधारणांच्या बाजूने होते. त्याची सुरवात त्यांनी केली आहे. त्यामुळे नवाब मलिक काय म्हणतात, त्याला अर्थ नाही. महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेसोबत सत्तेवर असताना कायदा तयार केला, त्यात किमान हमीभाव नाही दिला तर एक वर्षाची शिक्षा अशी तरतूद केली. केंद्रातील कायद्यांमध्येही अशाच तरतुदी आहेत. मात्र, आज त्यावरून विरोधक केवळ आणि केवळ राजकारण करीत आहेत.” – देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री
  • “केंद्रातील सरकार हे सचिव नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मंत्री चालवतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसारखी स्थिती केंद्रात नाही.” – देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात