विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा स्तर न्यायालयात दाखल केला होता, मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. दरम्यान बाळ बोठे अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत Bal bothe’s anticipatory bail rejected
अहमदनगरमधील वकील महेश तवले यांनी जामीनसाठी हा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस काढली होती, त्यानुसार त्यांनीही उपस्थिती लावत सर्व माहिती न्यायालयासमोर सादर केली. बोटे हे वर्तमानपत्राचा धाक दाखवून काही गैरकृत्येही करत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे. Bal bothe’s anticipatory bail rejected
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून त्यातील 3 आरोपींना 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App