विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममध्ये महिला सशक्तीकरणाचा अरूणोदय झाला आहे. प्रत्येक महिलेला स्वयंविकासासाठी महत्त्वाकांक्षी अरूणोदय योजनेची सुरवात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली आहे. महिलांचे सशक्तीकरण करणारी अरूणोदय योजना ही भारतातील सर्वात मोठी योजना दरमहा ८३० रूपये हे महिनाकाठी महिलांच्या खात्यावर परिवाराला मिळणार आहेत. नुमाली जलाह परेड मैदानावर झालेल्या सोहळ्यात या योजनेची सुरवात झाली. आसामचे अर्थमंत्री डॉ.हिमांता बिस्वा सरमा हे या सोहळ्याचे साक्षीदार होते. arunodoi scheme assam
या योजनेसाठी यंदाच्या वर्षी आसाम सरकारने २८०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. दारिद्रय रेषेखालील लोकांचे निमुर्लन करण्याच्या दृष्टीने आखलेल्या कार्यक्रमांसाठी ही योजना आहे. गरीबांवर किती खर्च केला जाईल हे सरकारने निश्चित केलेले नसलेतरी गरीबांचे आरोग्य आणि पोषण योग्य पध्दतीने होईल, अशी रक्कम सरकार गरीबांच्या खात्यावर वर्ग करणार हे मात्र नक्की आहे. असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. arunodoi scheme assam
सदृढ आरोग्य राखण्याबरोबरच योग्य पध्दतीने पालनपोषण व्हावे, मुलभूत सुविधा गरीब घरातील लोकांना उपलब्ध व्हाव्यात त्याच पध्दतीने या योजनेची रचना केली आहे. प्रत्येक महिन्यातील कुटूंबाचा औषधांचा होणारा खर्च लक्षात लक्षात ४०० रूपये सहाय्य केले जाईल. त्याचप्रमाणे ५० टक्के सवलत ही ४ किलोपर्यतच्या वस्तूंवर २०० रूपयांपर्यत तर ८० रूपये सवलत ही साखर आणि इतर जीवनावश्यक भाजीपाल्यावर आणि १५० रूपयांच्या फळावर असेल, ही वैद्यकीय आणि पोषणासाठी परिवाराला ८३० रूपयांचे निश्चित सहाय्य ठरणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेंची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमातंर्गत देण्यात येणार सर्व रक्कम आणि त्याचप्रमाणे सवलतीची रक्कम ही वेळेत घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेच्या खात्यावर थेट वर्ग होणार आहे. घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेच्या हातात ही रक्कम पडली तर ती या रक्कमेचा विनियोग निश्चितच चांगल्या प्रकारे करू शकेल, असे अधिकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. महिलांच्या खात्याचा गैरवापर, दूरूपयोग होऊ नये,यासाठी महिलांनी आपल्या स्थानिक बॅंकेच्या ठिकाणी संपर्क साधून या योजनेचा फायदा घेता येईल, बेकेत जन धन योजनेच्या बाबतीत बॅका तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी संपर्क खाते उघडून दिले होते.
सप्टेंबरमध्येच अर्ज प्रक्रिया सुरू
यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्येच अरूणोदय योजनेसाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली. घरकाम करणाऱ्या महिलांबरोबरच विधवा, अविवाहित, निराधार व्यक्तींना या योजनेसाठी प्राधान्य दिले जात आहे. घरात चारचाकी वाहन, नोकरी, ट्रँक्टर, फ्रीज, टिव्ही इत्यादी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. पात्र महिलेने या योजनेचा लाभ याच वर्षात यापूर्वी घेतलेला नसावा. एखादी महिला, व्यक्ती पात्र नसतानाही तिने या योजनेसाठी अर्ज भरला तर तिने स्वयंपूर्तीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तिचे नाव या योजनेतून वगळण्यात येईल.
८३० रूपये लाभार्थ्यांसाठी सरकारची तरतूद
या योजनेद्वारे ३३ जिल्ह्यातील साधारणतः ९० लाख लोकसंख्येसाठी जवळपास २० लाखांचे संरक्षण मिळाले याहे. त्यात २२७७ ग्रामपंचायत आणि १०० शहरी भाग आहेत. तथापि बिटडा जिल्ह्यात ही योजना तेथील निवडणूकीमुळे थांबविण्यात आलेली आहे, हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशावरून केले असून जवळपास ५०४ अरूणोदय सहाय्यक यासाठी मदत करणार आहे. चालु आर्थीक वर्षात २०-२१ पाच महिन्यात (नोव्हेंबर ते मार्च) याप्रमाणे पैसे अदा करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे.
भारतातील सर्वात मोठी योजना असणाऱ्या आसाम सरकारने आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी अरूणोदय योजना निश्चित केली आहे. या योजनेची खास वैशिष्ट्ये अशी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App