टिळकांच्या “स्मशानाचे रखवालदार” अग्रलेखाचा संदर्भ देताना शेलारांची जन्म – मृत्यूच्या शताब्दीची गल्लत

  • कोरोना काळातील मृत्यूदरावरून ठाकरे – पवार सरकारवर सडकून टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रातील मृत्यू आणि ठाकरे – पवार सरकारची बेपर्वाईची कामगिरी यावर सडकून टीका करताना भाजप आमदार आशिश शेलारांनी लोकमान्य टिळकांचा अग्रलेखाचा तपशील चपखल दिला, पण ते टिळकांच्या जन्म आणि मृत्यू शताब्दीची गल्लत करून बसले.

Tilak's "Guardian of the Cemetery

कोरोना काळात देशातील मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्रातला मृत्यूदर अधिक आहे. या वस्तूस्थितीकडे शेलारांनी ठाकरे – पवार सरकारचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात हजर होते. त्यांना उद्दशून शेलार म्हणले, की या सरकारची कामगिरी टिळकांनी लिहिलेल्या एका अग्रलेखाशी तंतोतंत मिळतीजुळती आहे. हिवताप, प्लेग, ज्वर यांनी अव्वल इंग्रजी काळात थैमान घातले होते. त्यावेळी इंग्रज सरकार म्हणत होते, की आम्ही काम करतोय. त्यावर टिळकांनी केसरीत संतापून अग्रलेख लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते, हे कसले सरकार हे तर आमच्या स्मशानाचे ऱखवालदार…!!

 

शेलारांनी अग्रलेखाचा संदर्भ तर बरोबर देऊन ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे जरूर काढले पण २०२० हे वर्ष टिळकांच्या जन्मशताब्दीचे नसून मृत्यू शताब्दीचे आहे, हे ते विसरले. टिळकांची जन्मशताब्दी १९५६ सालीच झाली पण शेलारांनी भाषणात टिळकांच्या जन्मशताब्दीचा उल्लेख केला. आणि मराठी वृत्तपत्रांच्या वेबपोर्टलवर देखील तो एडिट न करता तसाच छापलाही गेला. शेलार राज्याचे शिक्षणमंत्री होते. पण त्यांनी टिळकांच्या जन्म आणि मृत्यू शताब्दीची गल्लत करून ठेवली.

 

“करोना काळात मृतदेहांची अदलाबदल झाली. अ व्यक्तीचा मृत्यू झाला. पण ब व्यक्तीच्या कुटुंबाला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ब व्यक्ती रुग्णालयातच होती. मृतदेह गायब झाले. मृत्यूचा दर जास्त आहे. त्यावेळी एका महिलेचा करोनाने मृत्यू झाला. तिच्या मुलाला सांगण्यात आले की आम्ही पीपीई किट देणार नाही. तू मृतदेह घेऊन ये. अशा प्रकारे मृतदेहांसोबत असंवेदनशीलपणे व्यवहार करण्यात आला,” अशी खंत शेलार यांनी व्यक्त केली.

 

“यावेळेला आपण लोकमान्य टिळकांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहोत. या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या अग्रलेखांचे एक एक नमुने समोर आले. त्यामधील एक अग्रलेख आजच्या राज्याच्या स्थितीला इतका चपलख बसतो. इंग्रजांचं सरकार असताना टिळक असं म्हणाले होते, ‘हिवताप प्लेग याने पटापट मृत्यू होत आहेत आणि सरकार म्हणतंय आम्ही काम करतोय. हे कुठलं सरकार, हे तर आमच्या स्मशानभूमीचे रखवालदार.’ आजची राज्यातील स्थिती, मृत्यूच्या घटनांमध्ये, मृतदेहांच्या अदलाबदलीमध्ये सरकार स्मशानभूमीचं रखवालदार आहे, असे हे चित्र आहे,” अशी टीका शेलार यांनी केली होती. येथेच शेलारांचा जन्म आणि मृत्यूच्या शताब्दीचा संदर्भ चुकला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*