रेल्वेच्या १ लाख ४० हजार रिक्त पदांसाठी आजपासून भरती परीक्षा

प्रथम श्रेणी, तांत्रिक, अतांत्रिक सर्व पदे भरणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वेच्या विविध विभागातील रिक्त १ लाख ४० हजार पदांसाठी भरती परीक्षांना आजपासून सुरवात झाली आहे. विविध स्तरांतील पदासाठी ही परीक्षा प्रक्रिया एप्रिल २०२१ पर्यंत चालेल. यात देशभरातील तांत्रिक आणि अतांत्रिक सर्व प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत. Railway Recruitment examination from todayज्या पदांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांची पदे तात्काळ भरण्यात येतील. परीक्षांच्या आयोजनासाठी कोविड प्रोटोकॉलचे सर्व केंद्रांवर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार ही प्रक्रिया पार पडेल, असे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केले आहे.

Railway Recruitment examination from today

१५ डिसेंबर ते १८ डिसेंबरची परीक्षा संगणकावर आधारित प्रणालीच्या पदांसाठी होईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २८ डिसेंबर ते मार्च २०२१ पर्यंत अतांत्रिक पदासाठी होईल. तर प्रथम श्रेणीच्या परीक्षा एप्रिल २०२१ ते जून २०२१ दरम्यान होईल. या परीक्षा कोविडच्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहतील. त्याचे वेळापत्रक त्या महिन्याच्या आसपास जाहीर करण्यात येईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*