प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून त्यांच्या चिरंजीव आणि कन्येमध्ये जुंपली

  • काँग्रेस नेतृत्वावरील टीकेवरून वाद

वृत्तसंस्था

कोलकाता : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या अंतिम भागाच्या प्रकाशनावरून त्यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी आणि कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यात भांडण जुंपले आहे. दोघांनी ट्विटरवरून एकमेकांवर प्रहार केले आहेत. pranab mukherjee latest news

प्रणवदांनी लिहिलेल्या प्रेसिडेन्शिअल मेमॉर्यसचा अंतिम भाग त्यांनी लिहून ठेवला होता. पण त्याच्या प्रकाशनापूर्वीच ते कोरोनाने आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. आता आत्मचरित्राचा हा भाग जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित आहे. pranab mukherjee latest news

त्यातील काँग्रेस नेतृत्वावर टीका करणारा निवडक मजकूर माध्यमांमध्ये प्रकाशितही झाला आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जबाबदार होते, असे प्रणवदांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यावरूनच मुखर्जी भावा-बहिणीमध्ये जुंपलेली दिसते आहे.प्रणवदांचा मुलगा म्हणून मी प्रकाशकांना विनंती करतो, की त्यांनी लिहिलेल्या मजकूरावर मी अंतिम हात फिरवेपर्यंत आणि माझ्या लेखी परवानगीशिवाय आत्मचरित्राचा हा भाग प्रकाशित करू नये, असे ट्विट अभिजित मुखर्जी यांनी केले आहे.

त्याला शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणतात, प्रवणदांची मुलगी म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचा अंतिम भाग विनाअडथळा प्रकाशित व्हावा असे मला वाटते. मी माझ्या भावाला विनंती करते, की त्याने प्रकाशनात अनावश्यक अडथळा निर्माण करू नये. त्यात त्यांनी हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत. त्यांनी जे काही लिहिले आहे, ती त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्याच्या प्रकाशनात अडथळा आणणे ही प्रणवदांशी प्रतारणा ठरेल, अशा कठोर शब्दांमध्ये शर्मिष्ठांनी आपल्या भावाचा समाचार घेतला आहे.

अभिजित मुखर्जी हे पश्चिम बंगालमधून काँग्रेसचे आमदार आणि खासदार राहिले आहेत. ते २०१२ ते २०१९ या कालावधीत जांगीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. प्रणवदांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसने अभिजित मुखर्जी यांना उमेदवारी देऊन जांगीपूरमधून निवडून आणले होते.

pranab mukherjee latest news

तर शर्मिष्ठा मुखर्जी या देखील काँग्रेसच्या नेत्या आहेत. प्रणवदांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांच्या पत्नी शुभ्रा आजारी होत्या. त्यावेळी शर्मिष्ठांनी अनेक सरकारी कार्यक्रमांत प्रोटोकॉल म्हणून फर्स्ट लेडीची भूमिका पार पाडली आहे. २०१४ मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढविली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*