आसामी संस्कृतीला बांगलाशी घुसखोरांनी दिलेले आव्हान कसे मोडायचे?; हेमंत विश्वशर्मांनी दिला “बीजमंत्र”


वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसाममधील तेजपूर येथील श्रीमंत संकरदेव कालाक्षेत्र येथे मिया संग्रहालय उभारण्याची मागणी मुस्लिम आमदारांनी केली होती. ही बाब बांग्लादेशी घुसखोरांना आणि बांग्लादेशी मिया संस्कृतीला प्रोत्साहन देणारी होती.

त्याविरोधात मंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे 10 डिसेंबर 2020 रोजी आसाम आंदोलन हुतात्मा दिनी व्याख्यान झाले. त्यात त्यांनी आसामच्या आंदोलनाचा इतिहास तपशीलवार सांगितला. हेमंत विश्वशर्मा हे मूळचे काँग्रेसचे नेते.

परंतु, काँग्रेस नेतृत्वाने दिलेल्या वाईट वर्तणुकीमुळे ते भाजपमध्ये आले. त्यांनी जिद्दीने भाजपचा प्रचार करून आसाममधील विजयात मोलाची कामगिरी केली. मदरशांचे अनुदान रद्द करण्यासारखे धाड़सी निर्णय त्यांच्या पुढाकाराने सरकारने घेतले आहेत.

अशा या राष्ट्रवादी नेत्याच्या भाषणातील काही मुद्दे. –

  • मौलाना बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये अखिल भारतीय संयुक्त लोकशाही आघाडी कार्यरत आहे. आमदार शर्मन अली यांनी हे संग्रहालय उभारण्याची मागणी केली होती. हा पक्ष बांग्लादेशी समर्थक असून घुसखोरीला प्रोत्साहन देतो, अशी टीका केली जाते.
  • आसामी संस्कृती वाचविण्यासाठी शोणीतपुर येथे 1978 दरम्यान झालेल्या आंदोलनात 860 जणांनी हौतात्म्य पत्करले. खरगेश्वर तालुकेदार हे पहिले हुतात्मा होते.
  • अखेर 15 ऑगस्ट 1985 मध्ये झालेल्या कारारानंतर आंदोलन समाप्त झाले. पण, आसाम कराराच्या 6 व्या कलमाची अंमलबजावणी किंवा नागरिक राष्ट्रीय रजिस्टरचा मुद्दा असो. याबाबत 1978 मध्ये आसाम चळवळीत उडी घेतली होती. पण, राष्ट्राला वाचवण्याची चिंता संपली नाही. उलट समस्या आणखीनच वाढली आहेत.
  • नागाव आणि मोरीगा येथील काही शाळांचे नामकरण मिया शाळा असे केले आहे. हा प्रकार आसामी संस्कृतीला आव्हान देणारा आहे. एकेकाळी आसामी आंदोलनाला आव्हान देणारी मंडळी पुन्हा डोके वर काढत असल्याचे हे द्योतक आहे. कधी शाळांचे नामकरण, कधी संग्रहालय मागणी होते. भविष्यात मिया संस्कृतीतील कविताही ऐकायला मिळतील ? या सर्व गोष्टी आसामी भाषा संपविण्याचा प्रकार आहे.
  • आसाममधील भाजपच्या जागृत कार्यकर्त्यांमुळे आसामी संस्कृतीला आव्हान देणाऱ्यांना प्रतिआव्हान दिले. त्यांना वेळीच रोखले. अन्यथा एखादा मुख्यमंत्री मिया संग्रहालयाचे उदघाटन करून मोकळाही झाला असता. भाजपने आसाम आंदोलनाची मशाल तेवत ठेवली नसती अथवा कृतिशील कार्यकर्ते नसते तर आतापर्यंत बदरुद्दीन अजमल मोठ्या खुर्चीत बसल्याचे दिसले असते.
  • बारछाला, सिल्चर मतदारसंघात अनुक्रमे जेव्हा कार्यकर्ते रैली काढतात आणि एखाद्या पक्षाचा नेता जातो. तेव्हा पाकिस्तान जिंदाबादच्या अरोळ्या ऐकू येतात. क्रिकेट सामन्यात विजय झाल्यावर अशाच घोषणा दिल्या जातात. भारताच्या विजयानंतर शुकशुकाट असतो. हा प्रकार मोठे आव्हान बनत चालले आहे.
  • आसाममध्ये इस्लामी कट्टरता रुजविण्यासाठी अजमल फौंडेशनला परदेशातून देणग्या दिल्या जातात. दहा दिवसांपूर्वी 130 कोटी आणि त्यापूर्वी 8 कोटींची देणगी दिली होती.
  • आसाममध्ये 65 टक्के जनता आदिवासी असून अनेकजण आसाम सॊडून परराज्यात गेले आहेत. आता त्यांच्यावरच आसामी संस्कृती वाचविण्याची खरी जबाबदारी आली आहे.
  • आसाममधील बुद्धिवाद्यांनी संस्कृती वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. भूपेन डेका हत्याकांडाची घटना ते विसरले असावेत. भाषा,संस्कृतीवर झालेले आणि होणारे आक्रमण त्यांनी विसरू नये. केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याऐवजी भाषा आणि संस्कृतीला आव्हान देणाऱ्यांविरोधात एकत्र या.
  • परदेशी निधीच्या जोरावर आणि आक्रमक प्रवृत्तीने 126 पैकी 25 ते 40 मदारसंघातील अनेक लोकानी मतदारसंघ गमावला आहे. राजकीय हक्कापासून जमीन, जुमालाही त्यांनी गमावला आहे. ते गोहत्तीला गेले.
  • तेजपुर, बरछाला, नावबोचा येथे नागरिकांना आक्रमकांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. आसाम करार केल्यानंतर ही परिस्थिती आहे.
  • NRC कठोर अंमलबजावणी आणि बांग्लादेशी घुसखोरांची हकालपट्टी हा उपाय आहे. त्यादृष्टीने सरकार पावले टाकत आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात