भुजबळांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून जरांगेंनी वाढविला स्पर्धक की अजितदादांच्या राष्ट्रवादीत मारली मेख??

नाशिक : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या संघर्षात छगन भुजबळ यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतला स्पर्धक वाढविला की अजितदादांच्या राष्ट्रवादीत मेख मारली??, असा सवाल तयार झाला आहे. chhagan bhujbal becoming cm says  jarange patil

कारण छगन भुजबळांच्या जालन्यातल्या सभेच्या सभेतल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीसाठी घेतले. छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी दिलेला राजकीय वारसा विसरून ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी कराडमध्ये केला. याचा अर्थ जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या ताज्या शर्यतीत आत्तापर्यंत नसलेले छगन भुजबळांचे नाव त्या शर्यतीत आणले.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या उतावळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील इतकेच काय पण फर्स्ट टाइम आमदार रोहित पवारांचेही नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स वर झळकवले. राष्ट्रवादी अखंड असताना आणि दुभंगल्यानंतर देखील छगन भुजबळांचे नाव भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्स वर नव्हते.

पण मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या संघर्षात मनोज जरांगे पाटलांनी त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणले. त्यामुळेच एक संशय तयार झाला की, मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले एक नाव वाढविले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मेख मारून ठेवली??

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला कोणालाही आवडेल पण ते होण्यासाठी 145 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे अजित पवारांनी अनेकदा सांगितले. पण त्यांना आत्तापर्यंत 145 तर सोडाच, पण ट्रिपल डिजिट म्हणजे 100 आमदारांचाही पाठिंबा मिळू शकलेला नाही. तरी देखील अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा त्यांच्या आई आशाताई पवार यांनी देखील बोलून दाखविली. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सातत्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात राहिली.

या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी अजितदादांच्याच गोटातल्या छगन भुजबळांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून अजितदादांच्या राष्ट्रवादीत त्यांनाच एक नवा स्पर्धक तयार केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. आता जरांगे पाटलांचे हे वक्तव्य खरे होईल की नाही??, हे येणारा काळच ठरवेल. पण ते बोलणे खरे झाले, तर जरांगे पाटलांना हवे असणारे मराठा आरक्षण मिळू शकेल का??, हाchही कळीचा सवाल यातून तयार झाला आहे!!

chhagan bhujbal becoming cm says  jarange patil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात