छापा टाकायला गेलेल्या 6 जीएसटी अधिकाऱ्यांना दुकानदाराने कोंडले, केरळमधील 27 कोटींचे करचोरी प्रकरण


वृत्तसंस्था

कोझिकोडे : केरळमध्ये जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना दुकानदाराने दुकानात कोंडून टाकले. करचुकवेगिरी प्रकरणी छापा टाकण्यासाठी ते गेले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिकाऱ्यांना दुकानातून बाहेर काढले.6 GST officers who went to raid were caught by a shopkeeper, 27 crores tax evasion case in Kerala

त्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाही अधिकाऱ्याला दुकानात बंद केले नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. काही दुकाने बंद होती कारण आम्हाला नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जावे लागत होते. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना आधीच कळवले होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.



25 दुकानांवर छापा

प्रकरण केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील आहे. शुक्रवारी जीएसटी विभागाचे 50 जणांचे पथक छापा टाकण्यासाठी एका बाजारात पोहोचले होते. एसएम स्ट्रीट, तिरुवन्नूर आणि स्पेस मॉलमध्ये असलेल्या सुमारे 25 दुकानांवर छापे टाकण्यात येणार होते.

मार्केटमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना पाहताच दुकानदारांनी विरोध सुरू केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना कसेबसे शांत केले आणि छापा टाकण्यास सुरुवात केली. यादरम्यान काही दुकानदारांनी 6 अधिकाऱ्यांना एका दुकानात कोंडले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांना बाहेर काढले.

सर्व दुकाने दोन लोकांच्या भागीदारीत आहेत. जीएसटी विभागाचे पथक ज्या 25 दुकानांवर छापा टाकण्यासाठी पोहोचले ती दोन लोकांच्या भागीदारीत होती. त्यापैकी एक तुरुंगात आहे. या दुकानांच्या मालकांद्वारे 27 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचे इनपुट टीमला मिळाले होते. यानंतर पथकाने ही छापा मोहीम सुरू केली होती.

6 GST officers who went to raid were caught by a shopkeeper, 27 crores tax evasion case in Kerala

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात