CM Fadnavis : राज ठाकरेंच्या शंकांना नक्की उत्तर देणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लहान मुले पळवण्याविषयी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देण्याची ग्वाही दिली आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण यापूर्वीच सविस्तर आकडेवारी दिली आहे. पण त्यानंतरही त्यांच्या काही शंका असतील तर त्याला नक्की उत्तर दिले जाईल, असे ते म्हणालेत.