• Download App
    शवदहिनीत स्फोट; कर्मचारी भाजला डोंबिवलीत धक्कादायक घटना; आरोग्यसेवा थंडचwhile Cremation The staff is injured

    WATCH : शवदहिनीत स्फोट; कर्मचारी भाजला डोंबिवलीत धक्कादायक घटना; आरोग्यसेवा थंडच

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – डोंबिवलीत वृद्ध महिलेचा अत्यंसंस्कारा दरम्यान गॅस शवदाहिनाचा भडका उडाला. यात कर्मचाऱ्याचा चेहरा भाजला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र रुग्णवाहिका एक तास आणि पोलिस दीड तासार्पयत पोहचलेच नव्हते. कर्मचाऱ्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.while Cremation The staff is injured

    डोंबिवलीत राहणा:या एका वयोवृ्द्ध महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईक तिचा मृतदेह घेऊन पाथर्ली स्मशानभूमीत घेऊन गेले. गॅस शवदाहिनीमध्ये महिलेचा मृतदेह टाकताच भडका उडाला. या भडक्यात कंत्रटी कर्मचारी गोपाळ अडसूळ यांचा चेहरा भाजला.

    मृत महिलेचे नातेवाईक ही घटना पाहून हादरले. यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुरेंद्र ठोके यांनी रुग्णवाहिनीसाठी १०८ वर कॉल केला. त्यानंतर पोलिसांना १०० नंबरवही कॉल केले. पाऊन तास रुग्णवाहिका आलीच नाही.अखेर जखमी गोपाल यांना घेऊन शास्त्रीनगर रुग्णालय गाठले. तेथे उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नाव्हते. त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी नेले. जवळपास दीड तासानंतर पोलिस पोहचले.

    याबाबत ठोके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी हतबलता स्पष्ट केली. गोपाळ यांच्यावर कळवा रुग्णलयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेची पोलखोल झाली आहे. या बाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

    – शवदहिनीत स्फोट; कर्मचाऱ्यांच्या चेहरा भाजला

    – डोंबिवलीत धक्कादायक घटना; आरोग्यसेवा थंडच

    – रुग्णवाहिका, पोलिस वेळेवर पोचले नाहीत

    – शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरच नव्हते

    – कळवा रुग्णलयात कर्मचाऱ्यावर उपचार सुरु

    – महापालिकेच्या आरोग्य सेवेची पोलखोल

    while Cremation The staff is injured

     

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!