संजय राऊतांना शेजारी बसवून शरद पवारांची ज्ञानेश महारावांना मुलाखत; सामनाच्या पर्यायी कार्यकारी संपादक पदाची तयारी??


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची संयुक्त मुलाखत चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी घेतली. ती सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावरून सोशल मीडियातही जोरदार क्रिया – प्रतिक्रिया उमटत आहेत.Sharad Pawar’s interview with Dnyanesh Maharao sitting next to Sanjay Raut; Preparing for the position of Alternate Executive Editor of the match

परंतु या मुलाखतीचे नेमके राजकीय इंगित मात्र फारसे कुणी उघड करताना दिसत नाही. शरद पवार यांनी ज्ञानेश महाराव यांना मुलाखत देण्यासाठी राज्यसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय टायमिंग का निवडले?? संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि सचिन सावंत यांना आपल्याबरोबर का बसवून घेतले?? हे मात्र कुणी उलगडताना दिसत नाही.



पवारांची ही मुलाखत अर्थातच ज्ञानेश महाराव यांनी विशिष्ट विचारसरणीतून विचारलेल्या प्रश्नांच्या वर आधारित ठरली. पण या निमित्ताने शरद पवार आणि दस्तुरखुद्द संजय राऊत यांना शेजारी बसवून नेमका कोणता हेतू साध्य करून घेतला??, याचा नीट बारकाईने विचार केला तर एक बाब स्पष्ट होते… ती म्हणजे पवारांनी अत्यंत चलाखीने सामनाचा पुढचा कार्यकारी संपादक कदाचित निश्चित करून ठेवला आहे!!

 महानेत्यांच्या मुलाखती संजय राऊतांचा प्रांत

महाराष्ट्रातल्या महानेत्यांच्या मुलाखती हा गेल्या 25 वर्षात संजय राऊत यांचा प्रांत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती सामनातून संजय राऊत यांनी घेतल्या होत्या. त्या प्रचंड गाजल्या होत्या. बाळासाहेबांनंतर मधल्या मोठ्या गॅपनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही मुलाखती सामनातून आणि प्रत्यक्ष टीव्ही माध्यमात संजय राऊत यांनी घेतल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ते घेणार होते. त्यासाठी ते दोघे एकत्र एका हॉटेलमध्ये जेवायला भेटले होते. परंतु ती मुलाखत अद्याप झाली नाही. महाराष्ट्राच्या महानेत्यांमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीसांचे नाव बसत नसावे. त्यानंतर शरद पवारांची सामनामध्ये महामुलाखत येणार असेही मध्यंतरी बोलले गेले. परंतु ती मुलाखतही झाली नाही.

पण आज 3 जून 2022 मधील रोजी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या “कनेक्ट महाराष्ट्र” कार्यक्रमात शरद पवारांनी संजय राऊत यांना शेजारी बसवून घेऊन ज्ञानेश महाराव यांना मुलाखत दिली… याचा अर्थ सामनाचा पर्यायी कार्यकारी संपादक ते तयार करत आहेत असा घेतला तर त्यात फारसे वावगे ठरणार नाही!!

 राऊत यांची मक्तेदारी मोडली

मूळात महाराष्ट्रातल्या महानेत्यांच्या मुलाखती हे फक्त संजय राऊत घेतात, हे समीकरण शरद पवारांनी ज्ञानेश महाराव यांना मुलाखत देऊन जवळजवळ संपुष्टात आणले आहे!! पवारांची आणि राऊत यांची आजची मुलाखतही राऊत यांच्या आधीच्या मुलाखतींएवढीच किंबहुना अधिक गाजताना दिसत आहे. त्यातही प्रबोधन ठाकरे यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रबोधनकार समजून घेण्यासाठी पवार साहेबांचे व्याख्यान ठेवा, अशी सूचना करून प्रबोधनकारांना एक प्रकारे ठाकरे कुटुंबियांपासून अलगद बाजूला काढून पवारांच्या खात्यात जमा करून टाकले आहे!!

बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून विलगीकरण

त्यातही ज्ञानेश महारावांनी बाळासाहेब ठाकरे यांचे प्रबोधनकारांवरचे भाषण ऐका. ते लवकरच युट्युब वर टाकेन, असे सांगून बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वापासून कसे वेगळे आहे असे दाखवण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहेत, असे सूचित केले आहे. पण एकूण पवारांनी संजय राऊत यांना शेजारी बसवून ज्ञानेश महाराव यांना मुलाखत देऊन सामनाचा पर्यायी कार्यकारी संपादक तयार केल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar’s interview with Dnyanesh Maharao sitting next to Sanjay Raut; Preparing for the position of Alternate Executive Editor of the match

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात