• Download App
    फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू... Satire marathi poem on Nawab Malik ED custody

    फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू…

    विनायक ढेरे

    फू बाई फू फुगडी फू
    दमलास काय माझ्या नवाबा तू
    रे नवाबा तू

    शरद सांगे ये रे दाऊदशी खेळू
    रे दाऊदशी खेळू
    खेळ झाला तुझा
    ईडी तेल लागली काढू
    रे तेल लागली काढू

    फू बाई फू फुगडी फू
    दमलास काय माझ्या नवाबा तू
    रे नवाबा तू

    उगा लागलास नादी आर्यनच्या
    तू रे आर्यनच्या तू
    आर्यन सुटला बाहेर अन् अडकलास तू
    रे अडकलास तू

    फू बाई फू फुगडी फू
    दमलास काय माझ्या नवाबा तू
    रे नवाबा तू

    समीर म्हणे नसते झेंगट का घेतले
    झेंगट का घेतले
    हर्बल तंबाखूने नरडे सगळे धरले
    नरडे सगळे धरले

    फू बाई फू फुगडी फू
    दमलास काय माझ्या नवाबा तू
    रे नवाबा तू

    ईडी कोठडीत का गार गार वाटे
    का गार गार वाटे
    पुढे सगळे शरदनेच पसरलेत काटे
    रे पसरलेत काटे

    फू बाई फू फुगडी फू
    दमलास काय माझ्या नवाबा तू
    रे नवाबा तू

    (व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)

    Satire marathi poem on Nawab Malik ED custody

    Related posts

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन