• Download App
    मोदी – सोनियांना आव्हान द्यायला निघालेल्या राष्ट्रमंचाच्या पहिल्या बैठकीचा बार फुसका; बैठक पवारांच्या घरी झाली, पण ती पवारांनी बोलवली नव्हतीच; माजीद मेमन यांचा खुलासा reported in media that this meeting of Rashtra Manch was held by Sharad Pawar to unite anti-BJP political parties

    मोदी – सोनियांना आव्हान द्यायला निघालेल्या राष्ट्रमंचाच्या पहिल्या बैठकीचा बार फुसका; बैठक पवारांच्या घरी झाली, पण ती पवारांनी बोलवली नव्हतीच; माजीद मेमन यांचा खुलासा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – प्रचंड राजकीय आकांक्षा आणि अपेक्षा निर्माण करून बोलावलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचा पहिलाच बार फुसका निघाल्याचे आज सायंकाळी स्पष्ट झाले. राष्ट्रमंचाच्या बैठकीवरून जे काही तर्कवितर्क लढविले गेले, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांनी खुलासा केला, की ही बैठक ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरी झाली, पण ती शरद पवारांनी बोलावलेली नव्हती. तिच्यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. या खुलाशावरूनच राष्ट्रमंचाची ही पहिलीच बैठक फुसका बार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. reported in media that this meeting of Rashtra Manch was held by Sharad Pawar to unite anti-BJP political parties

    शरद पवार दिल्लीत पोहोचले. ते मोठा धमाका करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय देणारे नेतृत्व देणार अशा बातम्या कालपासून प्रसारमाध्यमांमध्ये चालविण्यात येत होत्या. मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे पवारांची दिल्लीत पॉवरफुल खेळी असे वर्णन करून पवारांनी एकाच वेळी मोदींना आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कसे आव्हान निर्माण केले आहे, याची वर्णने केली होती.

    ही बैठक आज पवारांच्या ६ जनपथ या निवासस्थानी पार पडली. विविध पक्षांच्या नेत्यांसह अन्य क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आले होते. बैठकीला राष्ट्रवादीचे माजीद मेमन, वंदना चव्हाण, सीपीआयचे विनय विश्वम, आम आदमी पार्टीचे शुशील गुप्ता, समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, ज्येष्ठ वकिल के टी एस तुलसी, ल्यूटन्स दिल्लीतील पत्रकार करण थापर, आशुतोष, आरएलडीचे जयंत चौधरी, माजी खासदार शाहीद सिद्दीकी, ओमर अब्दुल्ला, गीतकार जावेद अख्तर हे उपस्थित होते.

    या बैठकीची माहिती माजीद मेमन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, असे रिपोर्टिंग झाले, की शरद पवारांनी भाजप विरोधी शक्तींची बैठक बोलावली आहे. आणि शरद पवार साहेब फार मोठी झेप घेत आहेत. काँग्रेस नेत्यांनी त्यावर बहिष्कार घातला आहे, हे सगळे चुकीचे रिपोर्टिंग आहे. राष्ट्रमंचाची बैठक फक्त पवारांच्या घरी झाली. पण ती पवारांनी बोलावली नव्हती. संबंधित बैठक यशवंत सिन्हांनी बोलावली होती, असा खुलासा राष्ट्रमंचाचे संयोजक समाजवादी पक्षाचे नेते घनश्याम तिवारी यांनी केला.

    reported in media that this meeting of Rashtra Manch was held by Sharad Pawar to unite anti-BJP political parties

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…