Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न; भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय
काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून २०२६ च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे.’