• Download App
    शरद पवार साहेब फार मोठी राजकीय झेप घेताहेत आणि काँग्रेसवर बहिष्कार घातलाय, हे रिपोर्टिंग चुकीचे; राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांचा खुलासा This is being said that Sharad Pawar sahab is taking big political step & Congress has been boycotted This is incorrect Majeed Memon, NCP

    शरद पवार साहेब फार मोठी राजकीय झेप घेताहेत आणि काँग्रेसवर बहिष्कार घातलाय, हे रिपोर्टिंग चुकीचे; राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांचा खुलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले आहेत. This is being said that Sharad Pawar sahab is taking big political step & Congress has been boycotted This is incorrect Majeed Memon, NCP

    शरद पवार साहेब हे फार मोठी झेप घेत आहेत आणि काँग्रेसने त्यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असे जे रिपोर्टिंग झाले आहे, ते चुकीचे आहे, असा खुलासा माजीद मेमन यांनी केला आहे.



    राष्ट्रमंचाच्या बैठकीची सविस्तर माहिती माजीद मेमन यांनी दिली. ते म्हणाले, की आजच्या बैठकीतून कोणत्याही विरोधी पक्षाला वगळण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेसचे नेते विवेक तनखा, मनीष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनू सिंघवी आणि शत्रुघ्न सिन्हा यांना राष्ट्रमंचाच्या बैठकीचे निमंत्रण दिले होते. परंतु, त्यांच्यापैकी काहींनी आपल्या बैठकीला उपस्थित राहण्यासंबंधीच्या जेन्युईन अडचणी सांगितल्या. ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे काँग्रेससारख्या मोठ्या विरोधी पक्षाला राष्ट्रमंचाच्या बैठकीतून वगळल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत.

    आजची बैठक ही राष्ट्रमंचाचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. त्यासाठी राष्ट्रमंचाचे संस्थापक सदस्य आणि कार्यकर्ते यांनी मदत केली होती. पण या बैठकीचे असे रिपोर्टिंग झाले की शरद पवार साहेब हे फार मोठी राजकीय झेप घेत आहेत आणि काँग्रेसला या बैठकीतून वगळण्यात आले आहे, हे रिपोर्टिंग चुकीचे आहे, असे माजीद मेमन यांनी स्पष्ट केले.

    राजकीयदृष्ट्या कोणाला वगळण्याचा प्रश्न नाही. मी स्वतः काही काँग्रेस नेत्यांना बोलावले होते. ज्यांना राष्ट्रमंचाची विचारप्रणाली मान्य आहे, ते सगळे राष्ट्रमंचाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. इथे आम्ही राजकीय भेदभाव करीत नाही. बैठकीला जावेद अख्तर आणि निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शहा उपस्थित होते. त्यांनी त्यांचे विचार बैठकीत मांडले. त्यामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रमाची चर्चाच नव्हती, असाही खुलासा माजीद मेमन यांनी केला.

    This is being said that Sharad Pawar sahab is taking big political step & Congress has been boycotted This is incorrect Majeed Memon, NCP

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!