Pariksha Pe Charcha : कार्यक्रमाची तारीख ठरली ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा 2022 (Pariksha Pe Charcha 2022) हा कार्यक्रम शुक्रवारी 1 एप्रिलला होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा 2022 (Pariksha Pe Charcha 2022) हा कार्यक्रम शुक्रवारी 1 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. परीक्षा पे चर्चा गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं झाली होता. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चला परीक्षांचा महोत्सव साजरा करुया. तणावरहित परीक्षांची चर्चा करुयात.Pariksha Pe Charcha 2022

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 1 एप्रिलला पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबरच्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं .

नरेंद्र मोदी यांचं ट्विट

 

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम कुठं होणार?

कोरोना विषाणू संसर्गामुळं गेल्या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं झाला होता. या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबरच्या ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी 2022 मध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा या अंतर्गत संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं होतं. विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना त्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे होतं. 28 डिसेंबरपासून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची नोंदणी सुरु झाली होती.

परीक्षा पे चर्चामध्ये कोण सहभागी होतं?

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात 9 वी ते 12 मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव येऊ नये म्हणून मोदी त्यांना टीप्स देतात. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांसह त्यांचे आई वडील, शिक्षक देखील सहभागी करुन घेण्यात येत आहे.

 

Pariksha Pe Charcha 2021

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात