लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.Narendra Modi will arrive in Lucknow on November 22; A unique press release issued
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे.दरम्यान या निवडणुकांबाबत सध्या निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तरीसुद्धा या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेश दौरे वाढले आहेत.
दरम्यान येत्या २२ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरात येणार आहेत.लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. गोमतीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी स्थानिक सर्व इमारतीमधील रहिवाशांना हे पत्र पाठवले आहे.
Don’t dry your clothes on the balcony. Modiji is passing by. pic.twitter.com/x8NBEtgRN4 — Rohini Singh (@rohini_sgh) November 18, 2021
Don’t dry your clothes on the balcony. Modiji is passing by. pic.twitter.com/x8NBEtgRN4
— Rohini Singh (@rohini_sgh) November 18, 2021
या प्रसिद्धीपत्रकात मोदींचा सुरक्षेसाठी लखनऊ स्थनिकांनी चार दिवस आपल्या घराच्या बाल्कनी आणि खिडकीमध्ये कपडे वाळत घालू नये , कोणतीही गोष्ट लटकवून ठेऊ नका, आपल्या इमारतीमध्ये नवीन कुणी रहायला आल्यास तत्काळ पोलिसांना कळवा असे निर्देश दिले आहेत. हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यावर संतापजनक प्रितिक्रिया उमटत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App