अमित शहा मुंबईत : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा कळसाध्याय; कोण गळाला लागणार??, चव्हाण, ठाकरे, आणखी किती??

नाशिक/मुंबई : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा आज मुंबईत कळसाध्याय गाठला जातो आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा आज मुंबईत येत असून ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. आजच अमित शहांच्या हाय प्रोफाईल राजकीय गाठीभेटी देखील होणे अपेक्षित आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अमित शहा जाणार का??, तेथे गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्याशी राजकीय चर्चा करणार का??, याची सर्वाधिक चर्चा मराठी माध्यमांमध्ये रंगली आहे.High profile ganpati: Amit shah in Mumbai today; political meetings ahead of municipal elections

पण त्या पलिकडे जाऊन अमित शहा आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भेटणार का?? या भेटीनंतर अशोक चव्हाण थेट भाजपमध्ये येणार की भाजपमध्ये येण्याची रणनीती ठरवून त्याची नंतर अंमलबजावणी करणार??, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशोक चव्हाण यांच्यासाठी खास दिल्लीतून सूत्र हलल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना यासाठी कामाला लावल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा हे अशोक चव्हाण यांना आपल्या मुंबई दौऱ्यात अपॉइंटमेंट देणार का?? आणि दिल्यानंतर त्यांच्यात काय चर्चा होणार??, याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.



शिंदे, फडणवीस यांची गणेश दर्शन

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक नेत्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शने घेत आहेत त्यांच्याशी राजकीय चर्चा करून भाजप आणि शिंदे गट यांचे राजकीय स्थान मजबूत करत आहेत कालच गौरी आगमनाच्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या घरी गणेश दर्शने घेतली आहेत. पण त्याच वेळी एवढ्या हाय प्रोफाईल अधिकाऱ्याने मुंबईत आणि गणेशोत्सवात येणे आणि अतिवरिष्ठ नेत्यांना भेटणे याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित डोवाल मुंबईत असतानाच मोस्ट वॉन्टेड बंगाली दहशतवाद्याला मुंबई पोलिसांचे एटीएस आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे एसटीएफ यांनी एकत्र कारवाई करून अटक केली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद भारत दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक महत्त्वाची ठरली आहे.

आणि या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही मुंबई दौऱ्यावर येत असताना राजकीय गणेश दर्शनाचा कळसाध्याय सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात येथून पुढे नेमके काय घडते??, कसे घडते?? मुंबई सह सर्व महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अमित शहा हे भाजपसाठी कोणते फासे टाकतात??, आणि त्या फाशांमध्ये नेमके कोण कोण अडकते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

High profile ganpati: Amit shah in Mumbai today; political meetings ahead of municipal elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात