ममता बॅनर्जी पोटनिवडणूकीसाठी एवढ्या desparate का…??

निवडणूक आयोगाला केले लवकर तारखा जाहीर करण्याचे आवाहन


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीतून निवडून येऊन विधानसभेत लवकरात लवकर दाखल होऊ इच्छितात. त्यासाठी त्या एवढ्या desperate झालेल्या आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाला पश्चिम बंगाल मधील कोरोना संपूर्ण नियंत्रणात असल्याची ग्वाही देऊन टाकली आहे. COVID situation in West Bengal is totally under control. People have the right to cast their votes & to be elected to the Assembly.

निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख लवकरात लवकर जाहीर करून निवडणूक घ्यावी आणि लोकांना मतदानाचा अधिकार बजावू द्यावा, असे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले आहे. ममता बॅनर्जी या हट्टाने पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नंदिग्राम मधून सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. तृणमूल काँग्रेसला प्रचंड यश मिळूनही त्या स्वतः सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात हरल्या.

आता त्यांना मुख्यमंत्री पदावर कायम टिकून राहण्यासाठी सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून येणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. शिवाय सध्या पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेची पोटनिवडणूक घेऊनच निवडून यावे लागेल. यासाठी त्यांची आपला पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर तिथून निवडणूक लढविण्याची तयारी आहे. तेथून निवडून आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने त्यांच्यासाठी राजीनामा देखील दिला आहे.

परंतु निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरासाठी असा निर्णय घेतला आहे, की जोपर्यंत कोरोनाची लाट संपूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. जर पुढील तीन महिन्यात ममतांना अपेक्षित असणारी विधानसभेची पोटनिवडणूक झाली नाही, तर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची लाट आटोक्यात आहे. लवकरात लवकर निवडणुका घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे.

परंतु त्याच वेळी ममता दुसरीही भूमिका घेताना दिसत आहेत. कारण त्यांनी राज्यातील कोरोनाची लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारला वारंवार पत्र लिहून पश्चिम बंगालचा कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोरोनाची लाट जर आटोक्यात आहे, तर पश्चिम बंगाल कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा का वाढवून मागतो? असा प्रश्‍न केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांच्या सरकारला विचारू शकते. परंतु तरीही ममतांचे desperation एवढे आहे की यांनी निवडणूक आयोगापुढे कोरोनाची लाट पश्चिम बंगालमध्ये आटोक्यात असल्याचे निवेदन देऊन टाकले आहे.

COVID situation in West Bengal is totally under control. People have the right to cast their votes & to be elected to the Assembly.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub