BHAUBIJ BEST GIFT :‘बेस्ट’ची महिलांना भाऊबीजची बेस्ट भेट; आजपासून मुंबईत धावणार आणखी 100 महिला स्पेशल बस


  • नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई ‘बेस्ट’कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार  पडला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई ‘बेस्ट’कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार  पडला. दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि बेस्टचे महा ववस्थापक लोकेश चंद्र यांची उपस्थिती होती.
मुंबईमध्ये लाखो महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात, अशा महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षीत व्हावा यासाठी बेस्टकडून लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  या उपक्रमांतर्गत आजपासून मुंबईत 100 लडेजी स्पेशल बस धावणार आहेत. BEST GIFT ON BHAUBIJ

मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख आहे. बेस्ट बसेसने दररोज 30 लाख प्रवासी प्रवास करत असून यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट उपक्रमाच्या 27 बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील 100 बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेसमध्ये 90 बसेस या वातानुकूलित असणार आहेत. दरम्यान, सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या 37 महिला स्पेशल बस धावतात. त्यात आता या आणखी 100 बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या  137 झाली आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, महिलांचा प्रवस सुरक्षीत होण्यास मदत होणार असल्याची माहीत पेडणेकर यांनी दीली.

BEST GIFT ON BHAUBIJ

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात