• Download App
    अमित शहा रमले शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन | The Focus India

    अमित शहा रमले शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन

    विशेष प्रतिनिधी 

    कोलकत्ता (वृत्तसंस्था) : राष्ट्रगीताचे निर्माते आणि गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार विजेते मिळविणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी रविवारी अभिवादन केले. amit shah pays tribute to gurudev ravindranath tagore

    बंगाल दौर्‍याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, शहा हे हेलिकॉप्टरने कोलकत्ताहून बोलपूरला गेले आणि थेट विश्वभारतीच्या दिशेने गेले.

    बिरभूम येथील शांतिनिकेतनला शहा यांनी भेट दिली. टागोर यांना रवींद्रभवन येथे आदरांजली अर्पण केली. विश्वभारती शांतिनिकेतन विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा त्यांनी आनंदही लुटला.

    पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन हे केंद्रीय विद्यापीठ जे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी उभारले होते. रविवारी दुपारी विद्यार्थ्यांनी गीते व नृत्य सादर केली. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने शहा यांचा निषेध केला.

    amit shah pays tribute to gurudev ravindranath tagore

    माझे भाग्य आहे की मी विश्वभारतीला भेट दिली आणि जगभरात भारताची संस्कृती, तत्वज्ञान, ज्ञान आणि साहित्य पसरविणार्‍या एका महान व्यक्तीला आदरांजली वाहिली. त्यावेळी महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस दोघांनीही टागोर यांच्याकडून प्रेरणा घेतली.

    – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!

    दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!