विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २० लाख कोटींचे पँकेज जाहीर करताहेत तोच… लिबरल सोशल मीडियाचे अचाट मेंदूचे पुचाट प्रयोग सुरू झाले.
मोदींचे भाषण संपण्यापूर्वीच अरिफा खानम शेरवानी, निखिल वागळे, मिहिर शर्मा, तहसीन पूनावाला, अशोक सिवन आदींचे सोशल मीडिया अकाउंट प्रश्नचिन्हांनी, उद्गार चिन्हांनी आणि कुत्सित प्रश्नांनी भरून गेले. मोदीजी, जीडीपीच्या १०% पँकेज? पैसा आणणार कुठून? का नोटा छापणार झिंम्बाव्वेसारख्या? मोदीजी, तुमच्या पँकेजमध्ये आज रस्त्यावरून चालणाऱ्या मजूर, कामगारांचा समावेश आहे का हो? श्रीमंतांवर कर लावणार का त्यांच्याकडून कर्ज उचलणार? अशा तथाकथित बौद्धिक प्रश्नांची सरबत्ती लिबरल मीडियाच्या म्होरक्यांनी सुरू केली.
पण हिंदीतील म्हण आहे ना, हाथी चले बाजार तो * भौके हजार…!! असे झाले. मोदींना प्रश्न विचारणाऱ्यांची भंबेरी बाकीच्या नेटीझन्सनीच उडविली.
मूळात पँकेजची ती नुसती घोषणा आहे. तपशील बाहेर यायचे आहेत. ते तपशील आल्यानंतर genuine प्रश्न विचारताही येतील. पण हे उतावळे लिबरल थांबायला कुठे तयार आहेत? मोदींनी काहीही केले तरी त्यावर टीकाच करायची एवढाच यांचा अजेंडा असल्याने त्यांनी सोशल मीडियावर अचाट मेंदूचे पुचाट प्रयोग सुरू ठेवले. नेटीझन्सनीही त्यांना प्रत्युत्तर देणे सुरू ठेवले.
काँग्रेस पक्ष तर या लिबरलच्या पुढचा निघाला. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या मोदींकडे जीडीपीच्या ५ ते ६ % पँकेजची मागणी केली होती. मोदींनी जीडीपीच्या १०% पँकेजची घोषणा केली. मध्य प्रदेश काँग्रेसने त्यावर कडी करून जीडीपीच्या ५०% टक्के पँकेजची मागणी करून टाकली. काँग्रेसकडून राष्ट्रीय पातळीवर तरी अद्याप याचा खुलासा आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App