विशेष प्रतिनिधी
लखनऊ : जे फुकटात वीज देण्याचे बोलतात त्यांनी उत्तर प्रदेशला अंधारात टाकले. त्यांच्या काळात फक्त अंधार होता, जे उरले होते, ते दंगली आणि कर्फ्यू पूर्ण करत होते, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.Yogi Adityanath accuses Samajwadi Party of rioting and curfew
समाजवादी पक्षावर हल्ला चढविताना योगी आदित्यनाथ म्हणाले, 2017 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन होताच आम्ही तीन गोष्टी केल्या, ज्यात बेकायदेशीर कत्तलखाने बंद करणे, मुलींच्या सुरक्षेसाठी अँटी रोमियो पथक तयार करणे आणि शेतकऱ्यां ची कर्जमाफी करणे यांचा समावेश होता.
तसेच 2012 मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम श्री रामजन्मभूमीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्यात आले होते.योगी आदित्यनाथ म्हणाले , 10 मार्चला समाजवादी पाटीर्ने पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवासाठी सज्ज राहावे. समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांचे समर्थक आहे.
कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होत. मात्र, भाजपा सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. समाजवादी पक्ष गुन्हेगारांना उमेदवार घोषित करून विनाशाची यादी जारी केली आहे.
कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होते. आम्ही अशा घटकांना सांगितले आहे – काश्मीर आता स्वर्ग बनत आहे आणि पश्चिम उत्तर प्रदेश विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App