नव्या संसदेच्या उद्घाटनाला जेडीएस राहणार हजर; आम्ही काँग्रेसचे गुलाम नाही, कुमारस्वामींनी शिवकुमारांना सुनावले!!

वृत्तसंस्था

बेंगलोर : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या संघर्ष उडाला असतानाच काही प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसलाच फैलावर घेतले आहे. नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे ही देशासाठी आनंदाची बाब आहे. त्या कार्यक्रमाला जेडीएसचे खासदार उपस्थित राहतील. कारण जेडीएस स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. आम्ही काही काँग्रेसचे गुलाम नाही, अशा खणखणीत शब्दांत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि कर्नाटकचे विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना प्रत्युत्तर दिले आहे. We are not slaves of Congress and will take our own decision. Why do we need to follow Congress

संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेसने बहिष्कार घातला आहे परंतु जेडीएस सह अनेक पक्षांचे खासदार या समारंभावर बहिष्कार न घालता उपस्थित राहणार आहेत. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, ओरिसातील सत्ताधारी बिजू जनता दल, गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आदी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला नाही पण या सर्वांत कडक शब्दांमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येक पक्ष स्वतःची भूमिका घ्यायला स्वतंत्र आहे. देशात नवीन संसदेचे उद्घाटन होणे हे शतकातून एखादी होणारी घटना आहे. त्यामुळे जीडीएसचे खासदार या समारंभात सहभागी होतील. आम्ही काँग्रेसचे गुलाम नाही, असे कुमारस्वामी म्हणाले.

त्याआधी डी. के. शिवकुमार यांनी कुमारस्वामींना डिवचले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जेडीएसने मतदानात भाग घेतला नव्हता. आता ते राष्ट्रपतींच्या सन्मानाची पत्रास ठेवत नाहीत, असा आरोप शिवकुमार यांनी केला होता. या आरोपालाच आम्ही काँग्रेसचे गुलाम नाही अशा शब्दात कुमारस्वामींनी प्रत्युत्तर दिले आहे.

नागालँड मधील एनडीपी पार्टीचे प्रमुख टी. आर. झेलियांग यांनी देखील नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभासाठी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. संसद बांधण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसचा निर्णय निषेधार्ह असल्याचे वक्तव्य बिजू जनता दलाचे खासदार जयंत पटनायक यांनी केले आहे. त्यांना त्यांच्या निर्णय घ्यायला स्वातंत्र्य आहे. पण बिजू जनता दलाचे सर्व खासदार अभिमानाने उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनी देखील काँग्रेस विरोधात भूमिका घेऊन मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे.

We are not slaves of Congress and will take our own decision. Why do we need to follow Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात