मणीपूर विधानसभा निवडणुकीला हिंसक वळण

विशेष प्रतिनिधी

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. यावेळी काही हिंसक घटना घडल्या असल्याची बातमी समोर येत आहे. या हिंसक घटत २ जणांचा मृत्यूही झाला असल्याची माहिती आहे. Violent turn in Manipur assembly elections

हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळत आहे. सेनापती भागात मतदान केंद्रावर मतदारांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.



दरम्यान, मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात भाजपचे नेते एच बिजॉय यांच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब ने हल्ला केला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २२ जागांसाठी शनिवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात थौबल, चंदेल, उखरुल, सेनापती, तामेंगलाँग आणि जिरीबाम जिल्ह्यातील २२ जागांसाठी मतदान सुरू आहे.

Violent turn in Manipur assembly elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात