वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्याचे पडसाद राजधानी दिल्लीत उमटले.Veer Savarkar Ka Sharm Nahi Sahega Hindusthan!!; Shiv Sena-BJP MPs united in front of Chhatrapati’s statue in Parliament!!
एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या निलंबित खासदारकी भोवती एकवटून आंदोलन करत असता दुसरीकडे शिवसेना – भाजपचे खासदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमले आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार करत राहुल गांधींचा निषेध केला.
या आंदोलनात महाराष्ट्रातले शिवसेना – भाजपचे खासदार आघाडीवर होते. त्या आंदोलनात खासदार प्रकाश जावडेकर, पुनम महाजन, धनंजय महाडिक, हेमंत गोडसे सोलापूरचे सिद्धेश्वर स्वामी, खासदार राहुल शेवाळे, अनिल बोंडे यांच्यासह सर्व खासदार सहभागी झाले होते.
#WATCH | Maharashtra BJP MPs protest in front of the Shivaji statue in Parliament against Rahul Gandhi's comments on Savarkar. pic.twitter.com/zEhIecvSic — ANI (@ANI) March 27, 2023
#WATCH | Maharashtra BJP MPs protest in front of the Shivaji statue in Parliament against Rahul Gandhi's comments on Savarkar. pic.twitter.com/zEhIecvSic
— ANI (@ANI) March 27, 2023
राहुल गांधींच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या खासदारांनी आज अंगावर काळे कपडे परिधान करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना – भाजपच्या खासदारांनी सावरकरांच्या समर्थनाचे आंदोलन करून प्रत्युत्तर दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App