Religion Conversion Racket : यूपीच्या नोएडामध्ये धर्मांतरण घडवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. हे रॅकेट मागील दोन वर्षांपासून सक्रिय होते. आतापर्यंत एक हजाराहून अधिक बिगर मुस्लिमांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. यूपीचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, या प्रकरणात दोन मौलानांना अटक करण्यात आली आहे, ज्यांची चौकशी केली जात आहे. यासह परदेशातून फंडिंग, पैशांचे आमिष यासारखे 10 मोठे खुलासेही झाले आहेत. UP Police Busted Religion Conversion Racket in Noida, Top Ten Revelations By Police about Moulana Mohd Umar Gautam
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यूपीच्या नोएडामध्ये धर्मांतरण घडवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. हे रॅकेट मागील दोन वर्षांपासून सक्रिय होते. आतापर्यंत एक हजाराहून अधिक बिगर मुस्लिमांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. यूपीचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, या प्रकरणात दोन मौलानांना अटक करण्यात आली आहे, ज्यांची चौकशी केली जात आहे. यासह परदेशातून फंडिंग, पैशांचे आमिष यासारखे 10 मोठे खुलासेही झाले आहेत.
हे रॅकेट चालवल्याप्रकरणी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही दिल्लीच्या जामिया नगर भागातील रहिवासी आहेत.
पोलिसांना तपासात कळले की, मोहम्मद उमर गौतम हा पूर्वी हिंदूच होता, त्याने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांच्या वडिलांचे नाव धनराजसिंग गौतम आहे. पोलिसांना असा संशय आहे की, देशात उमरचे बरेच सहकारी आहेत आणि हे संपूर्ण रॅकेट चालवत आहेत.
नोएडामधील हे धर्मांतरणाचे रॅकेट गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय होते. एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात केवळ 350 जणांचे धर्मांतर झाले आहे आणि आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचे धर्मांतर झाले आहे.
पोलिसांनी म्हटले की, हे लोक महिला आणि मुलांना आपले लक्ष्य बनवत असत. नोएडाच्या सेक्टर 117 मध्ये असलेल्या नोएडा डिफ सोसायटीसह अनेक कर्णबधिर मुलांचे धर्मांतर झाल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत 18 मुलांचा धर्म बदलला गेला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांच्या पालकांना त्यांचे धर्मांतर माहिती नव्हते.
एफआयआरनुसार, हे लोक केवळ धमकावण्याद्वारेच नव्हे, तर नोकरी व पैशाचे आमिष देऊन लोकांचे धर्म परिवर्तीत करत असत. त्याच वेळी, मानसिक दबावदेखील तयार केला गेला. एवढेच नव्हे, तर आरोपी वेळोवेळी परिषद आयोजित करून सामूहिक धर्मांतरण घडवून आणत असत.
एटीएसने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, या लोकांनी आतापर्यंत एक हजाराहून अधिक मुस्लिमांना इस्लाम धर्मात परिवर्तित केले आहे. धर्मांतरानंतर त्यांचे मुस्लिमांशी लग्न लावले जाते.
चौकशीत हे समोर आले आहे की, प्रथम हे लोक कमकुवत गट, गरीब, स्त्रिया यांचा शोध घेऊन मग मोहम्मद उमर आणि त्याचे साथीदार पद्धतशीरपणे बिगर मुसलमानांमध्ये त्यांच्या धर्माबद्दल द्वेष आणि घृणा तयार करत असत. इस्लामचे कौतुक करून फायदे सांगत. ब्रेनवॉश केल्यावर त्यांना धर्मांतरासाठी तयार करत.
एटीएसने सांगितले की, उमर व त्याच्या साथीदारांनी धर्म परिवर्तनचे काम करण्यासाठी इस्लामिक दावा सेंटर (आयओसी) नावाची संस्थादेखील तयार केली होती, ज्याचा पत्ता दिल्लीच्या जामिया नगरात नोंदविला गेला आहे. तिथूनच बिगर मुस्लिमांना इस्लाममध्ये परिवर्तित करण्याचे काम करण्यात येत होते.
या रॅकेटमध्ये एटीएसला परकीय निधी मिळाल्याचा पुरावाही सापडला आहे. एफआयआरनुसार धर्मांतरासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि परदेशी देशांकडूनही निधी उपलब्ध होत होता.
या प्रकरणात आरोपी प्रथम लोकांचे धर्मपरिवर्तन करायचे, त्यांचे लग्न लावून द्यायचे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर आणि लग्नाच्या कागदपत्रांना अवैधरीत्या कायदेशीर मान्यता मिळवून देत असत. या कामात उमरला मुफ्ती काझी मदत करायचा.
UP Police Busted Religion Conversion Racket in Noida, Top Ten Revelations By Police about Moulana Mohd Umar Gautam
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App