वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. महाराष्ट्रातील १२ हून अधिक मंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. Union Minister of State for Health Bharti Pawar too Corona infection; given Information by tweeting
कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. राज्यातली रुग्णसंख्या आकडा चिंताजनक आहे. दररोज त्यात मोठी वाढ होत आहे. आता राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ट्वीट करत कोरोना झाल्याचे सांगितले.
ट्वीटमध्ये भारती पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या गृहविलगीकरणात आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच नियमांचं पालन करावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App