Tokyo Olympics 2020 : पहिलवान रवी दहियाने घडवला चमत्कार, देशाला मिळवून दिले रौप्य पदक, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

Ravi Dahiya Wins Silver : हरियाणाच्या सुपुत्राने टोकियोऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील कुस्तीपटू रवी दहिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. 57 किलो वजनी गटात त्याला रशियन पैलवान जावूर युवुगेवाने पराभूत केले. युवुगेवाने आपला सर्वोत्तम बचाव सादर केला आणि गुणांच्या आधारावर सामना 7-4 ने जिंकला. Tokyo Olympics 2020 Ravi Dahiya Wins Silver in Wrestling


वृत्तसंस्था

टोकियो : हरियाणाच्या सुपुत्राने टोकियोऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील कुस्तीपटू रवी दहिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. 57 किलो वजनी गटात त्याला रशियन पैलवान जावूर युवुगेवाने पराभूत केले. युवुगेवाने आपला सर्वोत्तम बचाव सादर केला आणि गुणांच्या आधारावर सामना 7-4 ने जिंकला.

युवुगेवाने सुरुवातीचा गुण मिळवला, पण रवी दहियाने लवकरच स्कोअर 2-2 केला. यानंतर रशियन खेळाडूने पुन्हा आघाडी घेतली. रवी पहिल्या फेरीनंतर 2-4 ने पिछाडीवर होता. दुसऱ्या फेरीतही युवुगेवाने एक गुण मिळवत आपली आघाडी मजबूत केली. रवीला दुसऱ्या फेरीत फक्त दोन गुण जमा करता आले. अशाप्रकारे, रशियन पैलवान जावूर युवुगेवाने अंतिम सामना 7-4 ने जिंकून सुवर्णपदक जिंकले.

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू रवी दहियाचे अभिनंदन केले. पीएम मोदी म्हणाले, “रवी कुमार दहिया एक हुशार कुस्तीपटू आहे. त्याची लढण्याची भावना आणि दृढता उत्कृष्ट आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे.”

भारताला कुस्तीमध्ये दुसरे रौप्य पदक

भारताचे कुस्तीतील हे दुसरे रौप्य पदक आहे. यापूर्वी सुशील कुमार लंडन ऑलिम्पिक 2012 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने टोकियो क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे रौप्यपदक मिळवले. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 49 किलो वजनी गटात दुसरे स्थान मिळवले होते आणि देशाला रौप्य पदक मिळवून दिले होते. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताकडे आता दोन रौप्य पदके आहेत.

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा हा भारताचा एकमेव खेळाडू होता. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Tokyo Olympics 2020 Ravi Dahiya Wins Silver in Wrestling

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात