‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!

Giriraj Singh

UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 140 कोटींवर पोहोचली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन राहिला नसून भारत झाला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या आता जगातील सर्वात मोठी आहे. UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 140 कोटींवर पोहोचली आहे आणि हा आकडा चीनच्या लोकसंख्येपेक्षा सुमारे 2 दशलक्ष अधिक आहे. This is the population of those who give birth to dozens of children comments of Union Minister Giriraj Singh

आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येवर मोठे विधान केले आहे. ही वाढती लोकसंख्या संपूर्ण देशासाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले. गिरीराज सिंह म्हणाले, “वाढती लोकसंख्या भारताच्या सर्वांगीण विकासाला धोका आहे. आमची संसाधने मर्यादित आहेत. आज देशात सुमारे 150 जिल्हे आहेत जेथे जननक्षमतेचे प्रमाण वाढले आहे, ही लोकसंख्या कोणाची आहे? ही लोकसंख्या त्यांची आहे जे डझनभर मुलांना जन्म देतात, ही विशिष्ट समुदायाची आहे.’’

UNFPA चा ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ हा ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका फरक आहे.

महत्वाच्या बातम्या 

This is the population of those who give birth to dozens of children comments of Union Minister Giriraj Singh

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात