प्रतिनिधी
नवी दिल्ली : लालसिंग चढ्ढा बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर आमिर खानने आपले ऑफिस बदलले. ऑफिसमध्ये गृहप्रवेश करताना हिंदू देवतांची पूजा केली. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अनेकांनी आमिर खानला ट्रोल केले. Shah Rukh’s Vaishno Devi Darshan before the release of Pathan
आता शाहरुख खानचा पठाण सिनेमा रिलीज होण्यापूर्वी शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून अनेकांनी शाहरुखला देखील ट्रोल केले आहे. पण त्याच वेळी पठाण मधील त्याची नायिका दीपिका पदुकोण हिचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आमीर खानसारखेच लोक लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत, भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांचा आरोप
शाहरुखच्या पठाण सिनेमावर बहिष्कार घालण्याच्या काही पोस्ट विविध सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचा वैष्णोदेवीला गेल्याचा व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. आणि आता तर दीपिका पदुकोण 2020 मध्ये तिने जे एन यु मध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना सीएए आणि एनआरसी कायदा विरोधातल्या आंदोलनात पाठिंबा दिला होता. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दीपिका जेएनयू मध्ये गेली होती. तिचा सिनेमा आता येतो आहे काय करायचे माहिती आहे ना?, असे खोचक सवाल अनेकांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App