विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू- काश्मीlरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधातील तपास मोहीम सलग पंधराव्या दिवशी सुरूच होती. भट्टीदुरियान या जंगल परिसरात नव्याने दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या जंगलांमध्ये काही गुहा असून त्यातच दहशतवादी दबा धरून बसल्याचे बोलले जाते.Search is going in Kashmir valley
या भागातील संघर्षामध्ये सुरक्षा दलांचे नऊ जवान हुतात्मा झाले असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. एक अटकेत असलेला दहशतवादी देखील या चकमकीमध्ये मारल्या गेला आहे. ११ ऑक्टोबर रोजी या भागात सुरक्षादलाची ही मोहीम सुरू झाली होती.
सुरानकोट आणि मेंढर या भागांबरोबरच थानामंडी या वन परिसरात देखील शोध मोहीम सुरू आहे. सध्या येथील जंगल परिसरावर लष्कराचे हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले असून देखरेखीसाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. या भागांत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या बारापेक्षाही अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App