पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या विरोधात खेला होबे अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने याच घोषणेची नक्कल केली आहे. खेला होबेची भोजपुरी आवृत्ती खेल होई ए अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.Samajwadi Party’s copy of Mamata in Uttar Pradesh, Khela Hobe’s Bhojpuri version of Khel Hoi A.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या विरोधात खेला होबे अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने याच घोषणेची नक्कल केली आहे. खेला होबेची भोजपुरी आवृत्ती खेल होई ए अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सध्या निद्रिस्त अवस्थेत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीने गांभिर्याने निवडणुकाच लढविल्या नव्हत्या. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यासाठीही लढण्या समाजवादी पक्षाचे अनेक उमेदवार तयार नाहीत.
या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये चैतन्य आणण्यासाठी खेल हुई ए अशी घोषणा देण्यात आली आहे.उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. समाजवादी पक्षाने कॉँग्रेस किंवा बहुजन समाज पार्टीशी आघाडी करणार नाही असे स्पष्ट केले आहे. एकट्याच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
ंमात्र, आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन (एमआयएम) याठिकाणी लढणार असल्याने समाजवादी पक्षाची झोप उडाली आहे. आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवात केली आहे.
आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोचार्शी आघाडी केली आहे, अन्य कुणाशी नाही, पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे. याचा सर्वाधिक फटका हा समाजवादी पार्टीला बसणार आहे. याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतपेढी हिच समाजवादी पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे.
त्यालाच एमआयएम सुरूंग लावण्याची भीती आहे. त्यामुळे मुस्लिमांचे मसिहा अशी आपली इमेज करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आखलेली रणनितीच वापरण्याचे समाजवादी पक्षाने ठरविले आहे. त्याची नक्कल तृणमूल कॉँग्रेसच्या घोषणेपासूनच सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App