Salasar Balaji Mandir : योगी आदित्यनाथांचा बुलडोझर गुंड माफियांवर; अशोक गेहलोतांचा बुलडोझर सालासर बालाजी मंदिराच्या गेटवर!!


  • राजस्थानात सालासर बालाजी मंदिराचे मध्यरात्री बुलडोझर लावून गेट तोडले!!; राजस्थानात प्रचंड संताप Salasar Balaji Mandir  yogi adityanath bulldozar

वृत्तसंस्था

सालासर : महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली राजस्थान मधील जगप्रसिद्ध सालासर बालाजी महाराज मंदिराचे गेट राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारने मध्यरात्री बुलडोझर लावून तोडले. या गेटवर श्री रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती होत्या. त्या मूर्ती सन्मानाने
न उतरवता बिनदिक्कतपणे बुलडोझर लावून मंदिराचे गेट तोडण्यात आले.

गेहलोत सरकारच्या या बेदरकार बुलडोझर कारवाईमुळे यामुळे राजस्थानात प्रचंड संताप उसळला असून अशोक गेहलोत सरकार विरुद्ध जोरदार वातावरण निर्मिती झाली आहे. प्रदेश भाजपने याविरुद्ध आंदोलन पुकारले असून महामार्ग रुंदीकरणाला विरोध नाही पण गेटवर श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती सन्मानाने हलवून मग गेट तोडता आले असते.

परंतु अशोक गहलोत सरकारने हिंदूंच्या भावनांचा भावांना पायदळी तुडवत बुलडोझर लावून गेट तोडल्याचा आरोप केंद्रीय जलसंपत्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला आहे.

– योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर

उत्तर प्रदेशात एकीकडे योगी आदित्यनाथ यांचे सरकार गुंड माफिया यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवत असताना आणि बुलडोझर हे गुंड माफिया यांच्याविरुद्ध से बलदंड प्रतीक झाले असताना राजस्थानात अशोक गेहलोत सरकारने मात्र बुलडोझर लावून ज्या गेटवर श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती होत्या ते तोडून टाकले आहे. त्यामुळे राजस्थानात प्रचंड संताप उसळला आहे मध्यरात्री गेट तोडण्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अशोक गेहलोत सरकारला प्रचंड घेण्यात येत आहे.

Salasar Balaji Mandir  yogi adityanath bulldozar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात